Ad will apear here
Next
सुट्टीत लहान मुलांनी केली सरबतविक्री; अर्धी कमाई देणार समाजकार्यासाठी
पुणे : सध्या पुण्यातील घोले रोडवरील सरबताचा एक स्टॉल खूपच चर्चेत आहे. हा स्टॉल सुरू केला आहे काही लहान मुलांनी. ऋषद तळेगावकर, जयनील भरद्वाज, आमोद गोरा आणि ईशान चंद्रचूड अशी त्यांची नावे आहेत. सुट्टीत घरी धमाल, दंगा-मस्ती करायची सोडून, काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा सरबताचा स्टॉल सुरू केला आहे. 

यातून मिळालेल्या कमाईचा अर्धा भाग ते समाजकार्यासाठी दान करणार आहेत. या मुलांची ही मेहनत आणि त्यामागचा उद्देश बघून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असून, लोक आवर्जून त्यांच्याकडे सरबत पिण्यासाठी जात आहेत. 

ऋषद तळेगावकरच्या संकल्पनेतून हा मुलांचा छोटासा व्यवसाय साकारला आहे. व्यवसाय कसा करतात, पैशाचा व्यवहार, हिशेब कसा सांभाळायचा हे कळावे आणि कष्टाने मिळवलेल्या पैशाचे मोलही समाजावे या हेतूने ही कल्पना मुलांसमोर मांडण्यात आली. त्याला मुलांनी आनंदाने होकार दिला आणि सुरू झाला बच्चेकंपनीचा सरबताचा स्टॉल. घोले रोडवरील फुटपाथवर ही मुले सरबत विकतात. रसना, लिंबू सरबत व इतर थंडपेये दहा रुपये किमतीला विकतात. याचे मार्केटिंगही मुले करतात. रस्त्याच्या एका कडेला सायकलवरून फेरी मारत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना थंडगार सरबताचा आस्वाद घेण्याचा आग्रह करतात. गेल्या आठ दिवसांत या मुलांना ९५० रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला असून, यातील अर्धी रक्कम गरजूंना दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे. आपण कोणाला तरी मदत करू शकतो, याचा आनंद मोठा असल्याची त्यांची भावना आहे. 

ऋषद तळेगावकर मित्रासह
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुले बाहेरगावी फिरायला जातात किंवा घरी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत दंगामस्ती करत सुट्टीचा आनंद घेतात. काही मुले घरी बसून तासन् तास मोबाइलवर गेम खेळतात किंवा टीव्ही पाहतात. काही जण मैदानी खेळ खेळतात. या पार्श्वभूमीवर, या मुलांनी कामाची लाज न बाळगता, आपल्या सुट्टीचा वेळ अशा उपक्रमात घालवावा आणि त्यातही समाजाचे आपण देणे लागतो याची जाणीव ठेवून आपल्या कमाईचा भाग इतरांना देण्याची तयारी दाखवावी, ही खूप मोठी बाब आहे. इतर मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही त्यांनी हा चांगला आदर्श ठेवला आहे. 

(सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZLICA
Similar Posts
तरुणांना व्यवसाय उभारण्याची संधी देण्यासाठी अभिनव उपक्रम पुणे : ‘सरकारी नोकऱ्यांमधील वाढलेली स्पर्धा, समाजातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि अॅ्मस्टेड क्लोदिंग कंपनीने पुढाकार घेतला असून, अवघ्या दीड लाख रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी शहरी व ग्रामीण तरुणांना मिळणार आहे.
‘रंगमंचीय अनुभवातून आयुष्य घडवण्याचे अमूल्य मार्गदर्शन’ अभिनय गुरुकुल किंवा गुरुकुल रंगभूमी, शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास अशा भन्नाट संकल्पना रुजवणारे आणि गेली जवळपास ३० वर्षं बालरंगभूमी क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यातील देवदत्त पाठक. आज (२७ मार्च) जागतिक रंगभूमी दिन आहे आणि जागतिक बालरंगभूमी दिन (२० मार्च) नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने,
‘महाबँके’चा ८४ वा व्यवसाय वर्धापन दिन साजरा पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्रच्या द्रष्ट्या संस्थापकांनी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा सन्माननीय ग्राहकांना आपुलकीच्या सेवेसह देत असल्याने अडीच कोटींपेक्षा अधिक ग्राहकांचा विश्वास या बँकेने संपादन केला आहे आणि हीच या बँकेची खरी शक्ती आहे,’ असे प्रतिपादन
‘घे भरारी’तून मिळणार व्यावसायिकांना बळ पुणे : ‘व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोल्डन ट्युलिप इव्हेंट्स’च्या वतीने ‘घे भरारी’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language